TOURIST POINTतुळजापूर पर्यटन स्थळ


काळभैरव:- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे. आदिमाया व आदिशक्ति:- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.

घाटशीळ:- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे. पापनाश तीर्थ:- हे एक तीर्थ असून पापनाशिनी: असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे.देऊळ जुने पण मजबूत आहे. धाकटे तुळजापूर:- येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.


Read More.. Live Darshan Share

Shri Mahalakshmi Temple Of Kolhapur


श्री महालक्ष्मी , कोल्हापूर (पूर्ण शक्तीपीठ) हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. http://www.mahalaxmikolhapur.com/

मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे. श्री महालक्ष्मीस करवीर निवासनि अशे हि म्हणतात श्री रेणुकादेवी , माहूर श्री रेणुकादेवी , माहूर(पूर्ण शक्तीपीठ) देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. श्री रेणुका – वरदां राम जननीं जमदग्निप्रियां सतीम् । एकवीरां महामायां ध्यायामि रेणुकां भजे ॥ ॥ श्री रेणुकादेव्यै नम: ॥ श्री सप्तशृंगीदेवी, नाशिक या देवीचे महात्म्य मोठे आहे. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठे आहेत. त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे. http://www.mahalaxmikolhapur.com/ 187KH, B ward, mangalwar peth, Kolhapur 0231- 0231-2541779 Fax : 0231-2626750


Read More.. Live Darshan Share

SHRI SWAMI SAMRTH


श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोटयेथे खूप काळ वास्तव्य केलेलेश्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे" हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले.

श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणुन अक्कलकोट प्रसिध्द आहे. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ३८ कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज ,अक्कलकोट ते तुळजापूर अंतर फक्त ६५ किलोमीटर आहे .अक्कलकोट मध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत.श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पुजली जाते. दर वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरी केली जाते. राज्यातून व पर राज्यातून मोठ्या संख्येने भक्त गण नित्य नेमाने भेट देतात. सध्याचे स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यान धारणा करीत व भक्तांना उपदेश देत असत. मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर, सभा मंटप व भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी व रात्री मोफत भोजनाची (प्रसादाची) व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे शके १७७९ च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले. श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले गेलेल्या श्री स्वामी समर्थांचा एकूण कार्यकाळ ४० वर्षाचा आहे त्यापैकी २१ वर्षे त्यांचे वास्तव्य अक्कलकोट येथे होते. इतिहासकारांच्या मते श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य शके १८०० मध्ये संपन्न झाले. पण तीन महिन्यानंतर स्वामी समर्थ काशी (वाराणशी) येथे प्रकट झाले. श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा ह्यांचा घरात आहे. हे ठिकाण समाधीमठ असे ओळखले जाते. भक्तांना संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे “भिऊ नकोस – मी तुझ्या पाठीशी आहे” हे घोष वाक्य श्री स्वामी सामार्थांचेच आहे.


Read More.. Live Darshan Share

Shri .Khandoba Jejuri Temple


Jejuri Temple. Khandoba , Martanda Bhairava Or Malhari, Is A Hindu Deity Worshiped As A Manifestation Of Shiva Mainly In The Deccan Plateau Of India, Especially In The States Of Maharashtra And Karnataka He Is The Most Popular Kuladaivat (Family Deity) In Maharashtra.

जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरी पासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधन पर पुस्तकात क-हापठारचाही इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्य काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत. निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे. खंडोबाची स्थाने अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद) जेजुरी (पुणे) देवरगुड्डा (राणीबेन्नूर) निमगाव धावडी (पुणे) पाली (सातारा) मंगसुळी (बेळगाव) माळेगाव (नांदेड) आदि मैलार (बिदर) मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा) मैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी) शेगुड (अहमदनगर) सातारे (औरंगाबाद) शेलवली-खंडोबाची (शहापूर ठाणे) काकनबर्डी (ओझर ता. पाचोरा जि. जळगाव)


Read More.. Live Darshan Share

Jyotiba Temple Kolhapur


ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते.

तीर्थक्षेत्र ज्योतिबा कोल्हापूर ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. इतिहास ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. कथा ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.


Read More.. Live Darshan Share

Gajanan Maharaj Temple


Shri Gajanan Maharaj Samadhi TempleThis town was once established by Shrungmuni ancient times and so was known as Shrung gaon. The famous temple of Lord Shiva in this town also gave it recognition as Shivgaon. Later Shivgaon became Shegaon. There might be a few legends about Shegaon but undoubtedly, it has a unique importance and identity. Shegaon mainly known for the arrival of a bounteous, pious and the most noble holy figure, i.e. Shri Gajanan Maharaj and his holy stay. One holy man landed in shegaon and with his omnipotent capacity changed the gloomy picture of this hamlet. He showered the blessings on the people who had barren life and gave them a taste of prosperity, spirituality and a path for meaningful life. Thus, this small village lying in the dark corners of Buldana district emerged as one of the happening places with spiritual touch in Maharastra.

गजानन महाराज, महाराजांच्या श्रेष्ठतेचे आणि संतत्वाचा महिमा सर्वदूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक ग‍रजा पूर्ण क‍रुन घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर महारष्ट्र आणि कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रधा स्थान आहे. पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती असे मानले जाते. http://www.gajananmaharaj.org/ Shri Gajanan Maharaj Sansthan, Shegaon Shegaon - 444203 Dist- Buldana(M.S.) E-mail : sansthan@gajananmaharaj.org Shri Mandir 07265-252018 / 252251 / 09881758762 Anand Vihar Bhakt Niwas Sankul 07265-252019 Visawa Bhakt Niwas Sankul 07265-253018 Bhaktaniwas Sankul Mandir Parisar 07265-252018 Bhaktaniwas Sankul Hattikhana Parisar 07265-252699 Shri Kshetra Pandharpur 02186 - 223522 Shri Kshetra Alandi 020 - 27186071 / 09767125035 Shri Kshetra Tryambakeshwar 02594- 233048 Shri Kshetra Omkareshwar 09753327083 / 09425371204 / 07280- 271204


Read More.. Live Darshan Share

Shri Kshetra Ganagapura Dattatreya Temple


गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे. गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे.

श्री दत्तात्रेय ही तीन मूखे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो. यांची दाढी वाढलेली असून, स्वरूप दिगंबर म्हणजे नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसते. चार कुत्री हे वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणार्‍या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. गाणगापूर ला लाखो भाविक दर्शनासाठी जातात.


Read More.. Live Darshan Share

Shirdi Sai Baba Temple


Shirdi, a small rural town in the Rahata Taluka of Ahmednagar district in the Maharashtra state of India. Shirdi is a secular place where all religions are treated as one & a belief in the power of Faith & Patience is foremost. A place where all heads bow down in prayer, where faith prevails, where hopes are built, where patience pays, and where infinite joy and everlasting contentment abound. Such is the glory of the place which belongs to the Holy Saint, a true repository of wisdom, who pleased all with pious equality and gifted mankind ornaments of humanity and peace by saying "SABKA MALIK EK". The footprints of Saibaba have made this town a holy place. Millions of devotees continuously flock here from all over India and abroad. Situated on the Ahmednagar-Manmad highway.

साई बाबा यांनी शिर्डी मध्ये एकतेचा संदेश दिला. साई बाबा यांच्या विचारला प्रेरीत होऊन साई चरणी नतमस्तक होतात .शिर्डी संस्थान हे अनेक सुखसोयी भाविकांना उपलब्ध करून देत आहे. देश पातळीवर साई बाबा यांच्ये भक्त आहेत. Shri Saibaba Sansthan Trust, (Shirdi) PO: Shirdi Tal. Rahata Dist. Ahmednagar State - Maharashtra India Pin: 423109 ‌ (02423)-258500 P.R.O, (02423)-258777 ‌ Office (02423)-258870 & P.R.O, Office (02423)- 258770 ‌ saibaba@sai.org.in, saibaba@shrisaibabasansthan.org ‌ www.shrisaibabasansthan.org, www.sai.org.in


Read More.. Live Darshan Share

Ashtavinayak


अष्टविनायक गणपती ॐ श्रीगणेशाय नमः वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत.पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते. श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. असे असले तरी, महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना, मूर्तींना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते.[ महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. १ मोरगांव २ थेऊर ३ सिद्धटेक ४ रांजणगाव ५ ओझर ६ लेण्याद्री ७ महड ८ पाली


Read More.. Live Darshan Share


TULJAPUR INFO
Shri Tuljabhavani Pujari Mandal Bhakta Niwas

02471244153

Location
Share Location

Shri Tuljabhavni Mandir

02471242031

Location
Share Location

HOW TO COME SHRI TULJABHAVANI TEMPLE, TULJAPURTO REACH TULJAPUR BY ROAD

1) Solapur to Tuljapur 2) Osmanabad to Tuljupur 3) Latur to Tuljapur 4) Barshi to Tuljapur 5) Omerga To Tuljapur

TO REACH TULJAPUR BY TRAIN

1) Solapur - 47 km Address 413002, Laxmi Vishnu Chawl, Solapur, Maharashtra Station code SUR 2) Osmanabad - 30 km Shingoli, Maharashtra 413501Station code UMD 3) Latur - 72 km Address Baswantpur, Latur, Maharashtra 413512 Station code LUR