Shri Kshetra Ganagapura Dattatreya Temple
गाणगापूर हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे. गाणगापूर भीमा नदी व अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे.श्री दत्तात्रेय ही तीन मूखे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर दिसून येतो. यांची दाढी वाढलेली असून, स्वरूप दिगंबर म्हणजे नग्न अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसते. चार कुत्री हे वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणार्‍या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. गाणगापूर ला लाखो भाविक दर्शनासाठी जातात.