Shri .Khandoba Jejuri Temple
Jejuri Temple. Khandoba , Martanda Bhairava Or Malhari, Is A Hindu Deity Worshiped As A Manifestation Of Shiva Mainly In The Deccan Plateau Of India, Especially In The States Of Maharashtra And Karnataka He Is The Most Popular Kuladaivat (Family Deity) In Maharashtra.जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरी पासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधन पर पुस्तकात क-हापठारचाही इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्य काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत. निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे. खंडोबाची स्थाने अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद) जेजुरी (पुणे) देवरगुड्डा (राणीबेन्नूर) निमगाव धावडी (पुणे) पाली (सातारा) मंगसुळी (बेळगाव) माळेगाव (नांदेड) आदि मैलार (बिदर) मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा) मैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी) शेगुड (अहमदनगर) सातारे (औरंगाबाद) शेलवली-खंडोबाची (शहापूर ठाणे) काकनबर्डी (ओझर ता. पाचोरा जि. जळगाव)