SHRI TULJABHAVANI TEMPLE INFOTuljabhavani Temple श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर


श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये प्रवेश करताना प्रथम भव्य आणि दिव्य असे राजे शाहजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वार आहे १०८ तीर्थाचा संगम असलेले कल्लोळ तीर्थ आहे उजव्या बाजूस आहे गोमुख तीर्थ आहे. गोमुख तीर्थाच्या उजव्या बाजूस आहे दत्ताचे यंत्र मंदिर आहे. पोलीस चौकी आणि उपदेवता यांचे मंदिरे दत्तयंत्र याच्या शेजारी आहेत. प्रथम वंदिनीय गणपती मंदिर आहे राजे निंबाळकर प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वार उतरत असताना उजव्या बाजूस आहे श्री देवीचा नगारा आहे त्या पुढे काही पायऱ्या उतरल्यास दिसतो यज्ञ मंडप (होम)आहे.यज्ञ मंडपच्या डाव्या बाजूस आहे

नवीन दर्शनासाठी तयार करण्यात आलेला दर्शनमंडप त्या मध्ये धर्मदर्शन आणि मुखदर्शन अशा दोन रांगा आहेत दर्शनासाठी दर्शन पास घेणे गरजेचे आहे.दर्शन मंडप मध्ये भाविकांना पाण्याची सोय,प्रसाधनगृह याची सोय आहे. श्री तुळजाभवानी मातेचे शिखर हे दिसते त्या शिखरावर अनेक देवी देवता उप देवता , प्राणी ,देवाचे रूपे हे दिसून येतात. मंदिर मधील उपदेवता म्हणजे येमाई देवी मंदिर ,श्रीलक्ष्मीनरसिंह मंदिर,जेजुरीचाखंडोबा मंदिर,श्रीदत्त मंदिर , श्री देवीचा जामदारखाना इत्यादी आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूस छत्रपती शिवाजी राजे प्रवेशद्वार आहे (छत्रपती शिवाजी महाराज ह्या मार्गे देवीच्या दर्शनासाठी येत अशी अख्यायिका आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री तुळजाभवानी मातेने भवानीतलवार दिली अशी अख्यायिका आहे). चिंतामणी म्हणजे सुकनावती अनेक भाविक या चिंतामणी वरती आपली इच्छा पूर्ण होईल का या साठी सुकून पाहतात. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये गोंधळ पूजेला महत्व आहे या पूजेसाठी लिंबाचा पार या ठिकाणी गोंधळ पूजा करण्यात येतात. श्री तुळजाभवानी मातेच्या अगदी समोर शंकराचे मंदिर आहे पण त्याची ओळख हि भवानीशंकर अशी आहे. श्री देवीच्या निद्रा करण्यासाठी एक चांदीचा पलंग आह्रे. असे हे मंदिर विविध कथा आणि रचनात्मक आहे


Read More.. Share


तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आणि वार्षिक सनउत्सव • चैत्र शुद्ध प्रतिपदा(गुडीपडवा)

 • श्री तुळजाभवानी मातेस साखरेचा हार(गाठी) श्री देवीस घालण्यात येतो,मंदिराच्या मुख्य शिखरासमोर छतावर गुढी उभारण्यात येते, श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक पुजेनंतर महावस्त्र नेसीवले जातात धूप आरती नंतर भाविकांना नव वर्ष सुख समृद्धी चे जाओ यासाठी प्रार्थना करण्यात येते.


 • चैत्र शुद्ध द्वितीया

 • सकाळी चरणतीर्थ, अभिषेक व पुजा आरती हे विधी नेहमी प्रमाणे होतात. चैत्र महिन्यापासूनच कडक उन्हाळ्यास सुरवात होते म्हणून दुपारी 1:00 ते 4:00 पर्यंत श्री देवीस चांदीच्या पंख्याने वारा घालतात.


 • चैत्र पौर्णिमा

 • चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात येतो, या दिवशी तुळजापूर मध्ये भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात होते.


 • वैशाख शुद्ध तृतीया(अक्षय तृतीया)

 • अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तसेच पितृ पूजनाचा दिवस असल्याने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात.


 • वैशाख शुद्ध चतुर्दशी(नृसिंह जयंती)

 • नृसिंह जयंती निमित्ताने मंदिरातील दैनंदिन पुजे नंतर नृसिंहसरस्वती मंदिर जवळील ओवरीत कच्ची डाळ आणि कच्या आंब्याचे पन्हे असा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात येतो.


 • ज्येष्ठ पौर्णिमा(वट पौर्णिमा)

 • वट पौर्णिमा या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात आणि शहरातील सुवसनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात.


 • आषाढ शुद्ध द्वितीया

 • श्री गजानन महाराज यांच्या पालखी मंदिरात श्री देवीच्या दर्शनासाठी येते. पालखी शहरात मुक्कामी असते.


 • आषाढ पौर्णिमा(गुरुपौर्णिमा/व्यासपोर्णिमा)

 • या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात, गुरुपौर्णिमा निमित्ताने दुपारी 12:00 वाजता अरण्य बुवा मठात गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करतात. श्री देवीच्या पूजेनंतर महंत आदीचा यथोचित सत्कार करण्यात येतो.


 • श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी)

 • श्री देवीचे चरण तीर्थ झाल्यानंतर भवानी शंकराचे पुजारी, होमाच्या समोर भवानीशंकराचा पितळेचा नागफना मांडून नागदेवता तयार करून ठेवतात, भाविक भक्त नागोबाला दूध लाह्या, उकडलेले कानवले असा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी उत्तरपूजा करून, कल्लोळ तीर्थ मद्ये विसर्जन केले जाते.


 • श्रावण शुद्ध षष्ठी (गौर पुजा)

 • गौर पुजे निमित्ताने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकारघालण्यात येतात.


 • श्रावण अमावस्या(बैल पोळा)

 • श्री देवीच्या दैनंदिन पुजा होतात, सायंकाळी 5:00 वाजता मठाचे महंत यांच्या बैलाचे कमान वेस भागात आगमन होते त्यांना श्री देवीच्या गाभाऱ्यात आणून त्यांना श्री देवीच्या पायाचे कुंकू लावण्यात येते.


 • भाद्रपद शुद्ध चतुर्दशी(अनंत चतुर्दशी)

 • श्री तुळजाभवानी मंदिर तर्फे गणेश विहार येथे पार्थिव गणेशाची स्थापना करण्यात येते. आणि अनंत चतुर्दशी दिवशी कल्लोळतीर्थ मध्ये विसर्जन करण्यात येते.


 • भाद्रपद वद्य अष्टमी (श्री तुळजाभवानी मातेची मंचकी{घोर} निद्रा)

 • या दिवसापासून ते शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होईपर्यंत मंचकी निद्रा सुरू होते.


 • श्री शारदीय नवरात्र उत्सव / दसरा उत्सव

 • आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते ,नऊ दिवस नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा दैनंदिन नवरात्र ललित पंचमी पासून करण्यात येतात. नवरात्र उत्सव काळात दैनंदिन छबिना काढण्यात येतो.
  श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.


 • दिपावली उत्सव

 • अश्विन ते कार्तिक महिन्यात येणारा दिपावली उत्सवही तुळजाभवानी मंदिरात साजरा करण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेस सुगंधी द्रव्यासह स्नान घातले जाते आणि दैनंदिन पुजा विधी होतात.


 • काळभैरव भेंडोळी उत्सव

 • काळभैरव भेंडोळी उत्सव हा जर वर्षी दिवाळीच्या नरकचतुर्दशी या वेळी स्थितीनुसार असतो , हा उत्सव पाहण्यासाठी हजोरो भाविक श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये येतात.


 • कार्तिक शुद्ध प्रतिपदा(पाडवा)

 • दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने त्यादिवशी श्री देवीला फराळाचे विविध नैवेद्य दाखवतात मंदिर मध्ये कलश पुजा पाडवा वाचन कार्यक्रम साजरा केला जातो


 • कार्तिक शुद्ध द्वादशी (तुळशी विवाह)

 • श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तुळशी विवाह करण्यात येतो.


 • कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)

 • त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने कल्लोळ तीर्थ स्वच्छ धुवून साडेसातशे कापसाच्या वाती पणत्या मद्ये ताटवा पुजन केले जाते. या पणत्या द्रोणावर ठेऊन पाण्यावर तरंगत सोडतात.


 • मार्गशीर्ष चंपाषष्ठी/मार्गशीर्ष पौर्णिमा(दत्त जयंती)/पौष शुद्ध प्रतिपदा (श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा)

 • या दिवसा पासून शाकंभरी नवरात्र उत्सव प्रारंभ होतो


 • श्री शाकंभरी नवरात्रत्सव

 • नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते , नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा करण्यात येतात, श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घटस्थापना होते याच नवरात्र उत्सव मद्ये गावातून जल यात्रा काढली जाते.


 • तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी

 • श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील रंगपंचमी ,श्री देवीच्या मंदिर मध्ये पारंपारिक पद्धतीने रंगपंचमी हा उत्सव साजरा होतो.


 • ग्रहण कालावधी

 • श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये ग्रहण काळात श्री देवीस सोवळ्यात आणि पांढर्याशुभ्र वस्त्रा मध्ये ठेवण्यात येते आणि साज शृंगार नसतो आणि ग्रहण कालवधी संपल्यावर श्री देवीस स्नान घातले जाते आणि पूजा करण्यात येते.


 • श्री तुळजाभवानी निद्रा

 • श्री तुळजाभवानी निद्रा ह्या तीन प्रकारच्या आहेत. श्री तुळजाभवानी मातेची मुळ मूर्ती हि सिहासनावरून उचलून श्री देवीच्या पलंगावर निद्रा साठी असते. श्री देवीचे असे रूपाचे दर्शन घेण्यासाठी हजोरो भाविक – भक्त दर्शनास येतात.


 • श्री तुळजाभवानी मातेचा छबिनाबद्दल माहिती

 • छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मुर्ती एका चांदीच्या मेघडंबरी मध्ये व श्री देवीच्या अनेक वाहनापैकी एका वाहनावर श्री देवीची चांदीची मुर्ती व पादुका ठेवुन मंदिरा भोवती एक प्रदिक्षणा पूर्ण करतात याला छबिना म्हणतात.
  श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार , पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्या नंतर एक दिवस अश्या प्रमाणे करण्यात येतो .अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदरच्या दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो .फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो.. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील २१ दिवस निद्राकाळातील छबिना काढला जात नाही.हा छबिना उत्सव पाहण्यासाठी हजरो भाविक येतात.
  महत्व :- श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवा मध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजुतील सर्व गावांच्या शिवा येता या शिवांवर ( हद्द ) उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते . येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो .या छबीना याचे महत्व अधिक आहे तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये छबीन्या समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात . या छबिन्या मध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्या वेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातवरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो.SHRI TULJABHAVANI FESTIVAL
Shardiya Navratri 2021 Date 7/10/2021 to 20/10/2021 Muhurat Ghatasthapana


शारदीय नवरात्र 2021महोत्सवातील  कार्यक्रम 1 ) भाद्रपद व.८ शके १९४३ वार बुधवार दि.29/9/2021 श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा  काळ सुरु होणार 2)अश्विन शु.१ शके१९४३ गुरुवार दि. 7/10/2021 श्री तुळजाभवानी मातेची पहाटे  सिहांसनावर प्रतिष्ठापना . तसेच ठीक दुपारी १२-०० वाजता घटस्थापना धार्मिक विधी ,रात्री छबिना www.shrituljabhavani.com 3 ) अश्विन शु.२ शके १९४३ शुक्रवार 8/10/2021 श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा व रात्री छबिना www.shrituljabhavani .com  4 ) अश्विन शु.३सह ४ शके १९४३ शनिवार दि.9/10/2021 श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा व रात्री छबिना www.shrituljabhavani .com  5 ) अश्विन शु.५ शके १९४३ रविवार दि. 10/10/2021 श्री तुळजाभवानी मातेस रथ अलंकार महापूजा( ललित पंचमी ) व मुरली अलंकार महापूजा रात्री छबिना. 6) अश्विन शु.६शके१९४३ सोमवार दि.11/10/2021 श्री तुळजाभवानी मातेस शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबिना. ७ ) अश्विन शु.७ शके१९४३मंगळवार दि.12/10/2021 श्री तुळजाभवानी मातेस भवानी अलंकार महापूजा व रात्री छबिना. ८) अश्विन शु.८ शके१९४३ बुधवार दि.13/10/2021 श्री तुळजाभवानी मातेस महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा,दुर्गाअष्टमी ,दुपारी ठीक ३:०० वाजता वैदीक होमास व हवनास आरंभ ,८:१० वाजता पूर्णाहुती व रात्री छबिना. 9) अश्विन शु.९ शके १९४३ गुरुवार दि.14/10/2021 महानवमी श्री तुळजाभवानी मातेस नित्योपचार पुजा, दुपारी १२:०० वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन,विजया दशमी दसरा शमीपूजन सार्वत्रिक सीमोल्लंघन व  रात्री छबिना आणि रात्री नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक www.shrituljabhavani.com 10) अश्विन शु.१० शके १९४३ शुक्रवार दि.15/10/2021 विजयादशमी दसरा सकाळी श्री तुळजाभवानी मातेचे शिबिकारोहण , सीमोल्लंघन मंदिर भोवती  मिरवणूक व मंचकी निद्रा (श्रमनिद्रा ) www.shrituljabhavani.com 11)अश्विन शु.१४ शके१९४३ मंगळवार दि.19/10/2021 कोजागिरी पौर्णिमा रात्री श्री तुळजाभवानी मातेची सिहांसनावर प्रतिष्ठापना व धार्मिक विधी. 12) अश्विन शु.१५ शके १९४३ बुधवार दि.20/10/2021 श्री तुळजाभवानी मंदिर ची पौर्णिमा व रात्री सोलापूरच्या काठ्यासह छबिना. श्री देवी भक्त आपल्या परिवारास श्रीचा कृपा पूर्ण शुभाशिर्वाद , प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी देवीच्या  शारदीय नवरात्र महोत्सवा प्रित्यर्थ अश्विन शु. १ पासुन अश्विन पौर्णिमा पर्यंत श्री तुळजाभवानी  दरबारात नित्य जगदंबेची महापूजा,अभिषेक, पाद्यपूजा व इतर पूजा होत असतात.  आपण श्री जगदंबा देवीचे नेहमी सेवा करणारे भाविक भक्त आहात. या उत्सवानिमीत्त आपल्या कुटुंबियांच्या वतीने कुलदैवत,कुलदेवी  श्री तुळजाभवानीची सेवा उपासना घडावी या हेतूने वार्षिक नवरात्र उत्सवाची पत्रिका पाठवली आहे. आपण आपल्या इच्छेप्रमाणे सेवा पाठवावी व श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद व प्रसाद घ्यावा. नवरात्र महोत्सवात आपणा तर्फे श्री देवीची महापूजा,अभिषेक पूजा (भोगी),नंदादीप, गोंधळ,सप्तशती पाठ , नवचंडी, शतचंडी,खण-नारळ ओटी पूजा, नैवेद्य -सवाष्ण -ब्राह्मण भोजन इत्यादी जे काही विधी करायचे असतील त्या विधी करता मनीआर्डर /UPI/ Google Pay/PhonePe/Paytm द्वारे  अथवा ऑनलाइन रक्कम  पाठवावी म्हणजे श्रीदेवीची सेवा करून श्री तुळजाभवानीचा कृपाप्रसाद पोस्टाने पाठवून देऊ.

Read More.. Share