Tuljabhavani Temple श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर
श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये प्रवेश करताना प्रथम भव्य आणि दिव्य असे राजे शाहजी महाद्वार आणि राजमाता जिजाऊ महाद्वार आहे १०८ तीर्थाचा संगम असलेले कल्लोळ तीर्थ आहे उजव्या बाजूस आहे गोमुख तीर्थ आहे. गोमुख तीर्थाच्या उजव्या बाजूस आहे दत्ताचे यंत्र मंदिर आहे. पोलीस चौकी आणि उपदेवता यांचे मंदिरे दत्तयंत्र याच्या शेजारी आहेत. प्रथम वंदिनीय गणपती मंदिर आहे राजे निंबाळकर प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वार उतरत असताना उजव्या बाजूस आहे श्री देवीचा नगारा आहे त्या पुढे काही पायऱ्या उतरल्यास दिसतो यज्ञ मंडप (होम)आहे.यज्ञ मंडपच्या डाव्या बाजूस आहेनवीन दर्शनासाठी तयार करण्यात आलेला दर्शनमंडप त्या मध्ये धर्मदर्शन आणि मुखदर्शन अशा दोन रांगा आहेत दर्शनासाठी दर्शन पास घेणे गरजेचे आहे.दर्शन मंडप मध्ये भाविकांना पाण्याची सोय,प्रसाधनगृह याची सोय आहे. श्री तुळजाभवानी मातेचे शिखर हे दिसते त्या शिखरावर अनेक देवी देवता उप देवता , प्राणी ,देवाचे रूपे हे दिसून येतात. मंदिर मधील उपदेवता म्हणजे येमाई देवी मंदिर ,श्रीलक्ष्मीनरसिंह मंदिर,जेजुरीचाखंडोबा मंदिर,श्रीदत्त मंदिर , श्री देवीचा जामदारखाना इत्यादी आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मागच्या बाजूस छत्रपती शिवाजी राजे प्रवेशद्वार आहे (छत्रपती शिवाजी महाराज ह्या मार्गे देवीच्या दर्शनासाठी येत अशी अख्यायिका आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री तुळजाभवानी मातेने भवानीतलवार दिली अशी अख्यायिका आहे). चिंतामणी म्हणजे सुकनावती अनेक भाविक या चिंतामणी वरती आपली इच्छा पूर्ण होईल का या साठी सुकून पाहतात. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये गोंधळ पूजेला महत्व आहे या पूजेसाठी लिंबाचा पार या ठिकाणी गोंधळ पूजा करण्यात येतात. श्री तुळजाभवानी मातेच्या अगदी समोर शंकराचे मंदिर आहे पण त्याची ओळख हि भवानीशंकर अशी आहे. श्री देवीच्या निद्रा करण्यासाठी एक चांदीचा पलंग आह्रे. असे हे मंदिर विविध कथा आणि रचनात्मक आहे