Shakambhari Navratri Info
2021-01-18


Shakambhari Navratri Info
शाकंभरी नवरात्रौत्सवाला सुरूवात, नऊ दिवस अशी करा अन्नपूर्णेची आराधना
दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक महत्त्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवीचं म्हणजेच देवी अन्नपूर्णा.
'ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति माहेश्वरि अन्नपूर्णे स्वाहा।।'
'ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति अन्नपूर्णे नम:।।'
'ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य: सुतान्वित:।
मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:।

नवरात्रशाकंभरी देवी आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं.शाकंभरी नवरात्रात अन्नपूर्णेची आराधना केली जाते.
आजपासून म्हणजेच पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होतंय. शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौस महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असतं. अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकंच शाकंभरी नवरात्राचंही खूप महत्त्व असतं. देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रुपांचं वर्णन केलं गेलंय, त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप आहे. शाकंभरी देवीला चार भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रुपात दर्शवलं गेलंय.

शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की, शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता. संपूर्ण ब्रम्हांड देवीचं मूल आहे. जाणून घ्या देवीच्या या अनोख्या रुपाची कथा आणि शाकंभरी नवरात्रातील पूजा विधीबद्दल...

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
देवी अन्नपूर्णेच्या अद्भुत रूपाची कथा –
एकदा पृथ्वीवर १०० वर्ष पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाना उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं. त्यांच्यावरील संकट बधून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं. या अवतारात देवीला १०० डोळे होते. आपल्या १०० डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दु:ख बघितले. यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली. देवीचं हे विराट रूप होतं. या रुपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाडं आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडला नाही, तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या, झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले.

शाकंभरी नवरात्र महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते.
श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये दि.२१/१/२०२१ ते २८/१/२०२१ पर्यंत शाकंभरी नवरात्र साजरे होणार आहे , www.shrituljabhavani.comOUR PUJA VIDHIS