तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आणि वार्षिक सनउत्सव
2021-01-18


तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आणि वार्षिक सनउत्सव
चैत्र शुद्ध प्रतिपदा(गुडीपडवा)
श्री तुळजाभवानी मातेस साखरेचा हार(गाठी) श्री देवीस घालण्यात येतो,मंदिराच्या मुख्य शिखरासमोर छतावर गुढी उभारण्यात येते,

श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक पुजेनंतर महावस्त्र नेसीवले जातात धूप आरती नंतर भाविकांना नव वर्ष सुख समृद्धी चे जाओ यासाठी प्रार्थना करण्यात येते.चैत्र शुद्ध द्वितीया
सकाळी चरणतीर्थ, अभिषेक व पुजा आरती हे विधी नेहमी प्रमाणे होतात. चैत्र महिन्यापासूनच कडक उन्हाळ्यास सुरवात होते म्हणून दुपारी 1:00 ते 4:00 पर्यंत श्री देवीस चांदीच्या पंख्याने वारा घालतात.चैत्र पौर्णिमा
चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात येतो, या दिवशी तुळजापूर मध्ये भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात होते.वैशाख शुद्ध तृतीया(अक्षय तृतीया)
अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तसेच पितृ पूजनाचा दिवस असल्याने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात.वैशाख शुद्ध चतुर्दशी(नृसिंह जयंती)
नृसिंह जयंती निमित्ताने मंदिरातील दैनंदिन पुजे नंतर नृसिंहसरस्वती मंदिर जवळील ओवरीत कच्ची डाळ आणि कच्या आंब्याचे पन्हे असा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात येतो.ज्येष्ठ पौर्णिमा(वट पौर्णिमा)
वट पौर्णिमा या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात आणि शहरातील सुवसनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात.आषाढ शुद्ध द्वितीया
श्री गजानन महाराज यांच्या पालखी मंदिरात श्री देवीच्या दर्शनासाठी येते. पालखी शहरात मुक्कामी असते.आषाढ पौर्णिमा(गुरुपौर्णिमा/व्यासपोर्णिमा)
या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात, गुरुपौर्णिमा निमित्ताने दुपारी 12:00 वाजता अरण्य बुवा मठात गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करतात. श्री देवीच्या पूजेनंतर महंत आदीचा यथोचित सत्कार करण्यात येतो.श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी)
श्री देवीचे चरण तीर्थ झाल्यानंतर भवानी शंकराचे पुजारी, होमाच्या समोर भवानीशंकराचा पितळेचा नागफना मांडून नागदेवता तयार करून ठेवतात, भाविक भक्त नागोबाला दूध लाह्या, उकडलेले कानवले असा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी उत्तरपूजा करून, कल्लोळ तीर्थ मद्ये विसर्जन केले जाते.श्रावण शुद्ध षष्ठी (गौर पुजा)
गौर पुजे निमित्ताने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकारघालण्यात येतात.श्रावण अमावस्या(बैल पोळा)
श्री देवीच्या दैनंदिन पुजा होतात, सायंकाळी 5:00 वाजता मठाचे महंत यांच्या बैलाचे कमान वेस भागात आगमन होते त्यांना श्री1 देवीच्या गाभाऱ्यात आणून त्यांना श्री देवीच्या पायाचे कुंकू लावण्यात येते.भाद्रपद शुद्ध चतुर्दशी(अनंत चतुर्दशी)
श्री तुळजाभवानी मंदिर तर्फे गणेश विहार येथे पार्थिव गणेशाची स्थापना करण्यात येते. आणि अनंत चतुर्दशी दिवशी कल्लोळतीर्थ मध्ये विसर्जन करण्यात येते.भाद्रपद वद्य अष्टमी (श्री तुळजाभवानी मातेची मंचकी{घोर} निद्रा)
या दिवसापासून ते शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होईपर्यंत मंचकी निद्रा सुरू होते.श्री शारदीय नवरात्र उत्सव / दसरा उत्सव
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते ,नऊ दिवस नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा दैनंदिन नवरात्र ललित पंचमी पासून करण्यात येतात. नवरात्र उत्सव काळात1 दैनंदिन छबिना काढण्यात येतो.

श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.OUR PUJA VIDHIS