OUR BLOGS

॥ अथार्गलास्तोत्रम् ॥


2021-01-04


ॐ अस्य श्रीअर्गलास्तोत्रमन्त्रस्य विष्णुर्ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, श्रीमहालक्ष्मीर्देवता, श्रीजगदम्बाप्रीतये सप्तशतीपाठाङ्गत्वेन जपे विनियोगः॥ ॐ नमश्‍चण्डिकायै॥ मार्कण्डेय उवाच ॐ जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी। दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते॥1॥ जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि। जय सर्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तु ते॥2॥ मधुकैटभविद्राविविधातृवरदे नमः। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥3॥ महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नमः। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥4॥ रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥5॥ शुम्भस्यैव निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥6॥ वन्दिताङ्‌घ्रियुगे देवि सर्वसौभाग्यदायिनि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥7॥ अचिन्त्यरुपचरिते सर्वशत्रुविनाशिनि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥8॥ नतेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥9॥ स्तुवद्‌भ्यो भक्तिपूर्वं त्वां चण्डिके व्याधिनाशिनि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥10॥ चण्डिके सततं ये त्वामर्चयन्तीह भक्तितः। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥11॥ देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखम्। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥12॥ विधेहि द्विषतां नाशं विधेहि बलमुच्चकैः। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥13॥ विधेहि देवि कल्याणं विधेहि परमां श्रियम्। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥14॥ सुरासुरशिरोरत्ननिघृष्टचरणेऽम्बिके। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥15॥ विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥16॥ प्रचण्डदैत्यदर्पघ्ने चण्डिके प्रणताय मे। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥17॥ चतुर्भुजे चतुर्वक्त्रसंस्तुते परमेश्‍वरि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥18॥ कृष्णेन संस्तुते देवि शश्‍वद्भक्त्या सदाम्बिके। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥19॥ हिमाचलसुतानाथसंस्तुते परमेश्‍वरि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥20॥ इन्द्राणीपतिसद्भावपूजिते परमेश्‍वरि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥21॥ देवि प्रचण्डदोर्दण्डदैत्यदर्पविनाशिनि। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥22॥ देवि भक्तजनोद्दामदत्तानन्दोदयेऽम्बिके। रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि॥23॥ पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्। तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम्॥24॥ इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः। स तु सप्तशतीसंख्यावरमाप्नोति सम्पदाम्॥25॥ ॥ इति देव्या अर्गलास्तोत्रं सम्पूर्णम् ॥


Read More... ShareShakambhari Navratri Info


2021-01-18


Shakambhari Navratri Info शाकंभरी नवरात्रौत्सवाला सुरूवात, नऊ दिवस अशी करा अन्नपूर्णेची आराधना दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक महत्त्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवीचं म्हणजेच देवी अन्नपूर्णा. 'ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति माहेश्वरि अन्नपूर्णे स्वाहा।।' 'ॐ ह्रीं श्रीं क्लीं भगवति अन्नपूर्णे नम:।।' 'ॐ सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य: सुतान्वित:। मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशय:। नवरात्रशाकंभरी देवी आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं.शाकंभरी नवरात्रात अन्नपूर्णेची आराधना केली जाते. आजपासून म्हणजेच पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र सुरू होतंय. शाकंभरी नवरात्र अष्टमीपासून म्हणजेच पौस महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत असतं. अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकंच शाकंभरी नवरात्राचंही खूप महत्त्व असतं. देवी शाकंभरीला आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रुपांचं वर्णन केलं गेलंय, त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप आहे. शाकंभरी देवीला चार भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रुपात दर्शवलं गेलंय. शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते. आपल्याला नावावरूनच लक्षात येईल की, शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता. संपूर्ण ब्रम्हांड देवीचं मूल आहे. जाणून घ्या देवीच्या या अनोख्या रुपाची कथा आणि शाकंभरी नवरात्रातील पूजा विधीबद्दल... सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।। देवी अन्नपूर्णेच्या अद्भुत रूपाची कथा – एकदा पृथ्वीवर १०० वर्ष पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाना उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं. त्यांच्यावरील संकट बधून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं. या अवतारात देवीला १०० डोळे होते. आपल्या १०० डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दु:ख बघितले. यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली. देवीचं हे विराट रूप होतं. या रुपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाडं आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडला नाही, तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या, झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले. शाकंभरी नवरात्र महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे. कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते. श्री तुळजाभवानी मंदिर मध्ये दि.२१/१/२०२१ ते २८/१/२०२१ पर्यंत शाकंभरी नवरात्र साजरे होणार आहे , www.shrituljabhavani.com


Read More... Shareतुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आणि वार्षिक सनउत्सव


2021-01-18


तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आणि वार्षिक सनउत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा(गुडीपडवा) श्री तुळजाभवानी मातेस साखरेचा हार(गाठी) श्री देवीस घालण्यात येतो,मंदिराच्या मुख्य शिखरासमोर छतावर गुढी उभारण्यात येते, श्री तुळजाभवानी मातेस अभिषेक पुजेनंतर महावस्त्र नेसीवले जातात धूप आरती नंतर भाविकांना नव वर्ष सुख समृद्धी चे जाओ यासाठी प्रार्थना करण्यात येते. चैत्र शुद्ध द्वितीया सकाळी चरणतीर्थ, अभिषेक व पुजा आरती हे विधी नेहमी प्रमाणे होतात. चैत्र महिन्यापासूनच कडक उन्हाळ्यास सुरवात होते म्हणून दुपारी 1:00 ते 4:00 पर्यंत श्री देवीस चांदीच्या पंख्याने वारा घालतात. चैत्र पौर्णिमा चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात येतो, या दिवशी तुळजापूर मध्ये भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात होते. वैशाख शुद्ध तृतीया(अक्षय तृतीया) अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने तसेच पितृ पूजनाचा दिवस असल्याने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात. वैशाख शुद्ध चतुर्दशी(नृसिंह जयंती) नृसिंह जयंती निमित्ताने मंदिरातील दैनंदिन पुजे नंतर नृसिंहसरस्वती मंदिर जवळील ओवरीत कच्ची डाळ आणि कच्या आंब्याचे पन्हे असा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात येतो. ज्येष्ठ पौर्णिमा(वट पौर्णिमा) वट पौर्णिमा या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात आणि शहरातील सुवसनी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. आषाढ शुद्ध द्वितीया श्री गजानन महाराज यांच्या पालखी मंदिरात श्री देवीच्या दर्शनासाठी येते. पालखी शहरात मुक्कामी असते. आषाढ पौर्णिमा(गुरुपौर्णिमा/व्यासपोर्णिमा) या दिवशी दैनंदिन धार्मिक विधी होतात, गुरुपौर्णिमा निमित्ताने दुपारी 12:00 वाजता अरण्य बुवा मठात गुरू पौर्णिमा उत्सव साजरा करतात. श्री देवीच्या पूजेनंतर महंत आदीचा यथोचित सत्कार करण्यात येतो. श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) श्री देवीचे चरण तीर्थ झाल्यानंतर भवानी शंकराचे पुजारी, होमाच्या समोर भवानीशंकराचा पितळेचा नागफना मांडून नागदेवता तयार करून ठेवतात, भाविक भक्त नागोबाला दूध लाह्या, उकडलेले कानवले असा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी उत्तरपूजा करून, कल्लोळ तीर्थ मद्ये विसर्जन केले जाते. श्रावण शुद्ध षष्ठी (गौर पुजा) गौर पुजे निमित्ताने श्री देवीस अभिषेक पूजेनंतर महाअलंकारघालण्यात येतात. श्रावण अमावस्या(बैल पोळा) श्री देवीच्या दैनंदिन पुजा होतात, सायंकाळी 5:00 वाजता मठाचे महंत यांच्या बैलाचे कमान वेस भागात आगमन होते त्यांना श्री1 देवीच्या गाभाऱ्यात आणून त्यांना श्री देवीच्या पायाचे कुंकू लावण्यात येते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी(अनंत चतुर्दशी) श्री तुळजाभवानी मंदिर तर्फे गणेश विहार येथे पार्थिव गणेशाची स्थापना करण्यात येते. आणि अनंत चतुर्दशी दिवशी कल्लोळतीर्थ मध्ये विसर्जन करण्यात येते. भाद्रपद वद्य अष्टमी (श्री तुळजाभवानी मातेची मंचकी{घोर} निद्रा) या दिवसापासून ते शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होईपर्यंत मंचकी निद्रा सुरू होते. श्री शारदीय नवरात्र उत्सव / दसरा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी 12:00 वजता घटस्थापना होते ,नऊ दिवस नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पुजा दैनंदिन नवरात्र ललित पंचमी पासून करण्यात येतात. नवरात्र उत्सव काळात1 दैनंदिन छबिना काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मधील एक अदभूत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मुर्ती हि मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखी मध्ये ठेऊन मंदिर प्रद्क्षना करण्यात येते. भाविक हळदी कुंकू यांची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात हा उत्सवा मध्ये लाखो भाविक सहभागी होतात.


Read More... ShareDurga Puja Pushpanjali


2021-01-19


ॐ जयन्ती, मङ्गला, काली, भद्रकाली, कपालिनी। दुर्गा, शिवा, क्षमा, धात्री, स्वाहा, स्वधा नमोऽस्तु ते॥ एष सचन्दन गन्ध पुष्प बिल्व पत्राञ्जली ॐ ह्रीं दुर्गायै नमः॥ ॐ महिषघ्नी महामाये चामुण्डे मुण्डमालिनी। आयुरारोग्यविजयं देहि देवि! नमोऽस्तु ते॥ एष सचन्दन गन्ध पुष्प बिल्व पत्राञ्जली ॐ ह्रीं दुर्गायै नमः॥ ॐ सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते॥१॥ सृष्टि स्थिति विनाशानां शक्तिभूते सनातनि!। गुणाश्रये गुणमये नारायणि! नमोऽस्तु ते॥२॥ शरणागत दीनार्त परित्राण परायणे!। सर्वस्यार्तिहरे देवि! नारायणि! नमोऽस्तु ते॥३॥


Read More... Share